गेली 12 वर्षे देशात काँग्रेस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतंय, अनेकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका झाली, काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका झाली.काँग्रेसच्या चुका अनेकांनी दाखवली, काँग्रेसने अंतर्गत बदल केले, नेते, प्रदेशाध्यक्ष, प्रवक्ते बदलले. पण काँग्रेसची परिस्थिती काही सुधारायची चिन्हं दिसेनात.प्रत्येक पराभवानंतर अनेक राजकीय विश्लेषक विश्लेषण करून थकले... पण काँग्रेस काही सुधारायचं नाव घेत नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसने तर विक्रम केलाय नवा... लढायच्या आधीच शस्त्र टाकण्याचा, महाराष्ट्र काँग्रेसने काय विक्रम केलाय पाहुयात.