Legislative Council elections मध्ये काँग्रेसचं पानिपत; नागपूर पदवीधरमध्येच फक्त काँग्रेस विजयी

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 28 विधान परिषद जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत जरी NDA ने 16 जागांवर विजय मिळवत वर्चस्व राखलं असलं, तरी देशातील दोन प्रतिष्ठेच्या लढतींनी भाजपची चिंता वाढवलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसी मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात, त्या वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झालाय. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. तर दुसरीकडे काँग्रेसला हिणवताना पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलंय, पाहूयात एक रिपोर्ट... Congress suffers a rout in Legislative Council elections; wins only the Nagpur Graduates' constituency seat.

संबंधित व्हिडीओ