#NCP #ManikraoKokate #Mahyuti #ndtvmarathi राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभेतील कथित रमी खेळण्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवण्याऐवजी त्यांच्याकडील खाते बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनुसार, त्यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधीलच दुसरे मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे