मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'हिरवा मुंब्रा' विधानावरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळलाय. सहर शेख यांच्यानंतर आता इम्तियाज जलील यांनीदेखली मुंब्राच काय भविष्यात देशाला हिरवा करू असं विधान केलंय. तसेच मुंब्रा पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरुन सहर शेख यांना नोटीस दिली होती असा सवालही त्यांनी उपस्थित केलीय.