मुंबई महापालिका निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील धुसफूस उघड होऊ लागली आहे.भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले असले तरी, काही माजी नगरसेवकांना या निवडणूकित अगदी थोडक्यात पराभव पत्करावा लागला.विजयाची खात्री असलेल्या तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांच्या पदरी पराभव पडल्यामूळे भाजपच्या जागा कमी झाल्या.या प्रभागांमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाकडून काहीच मदत मिळाली नाही, उलट विरोधी केल्याची कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. विरोधी पक्षाला म्हणजेच काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मदत झाली आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आल्याची चर्चा आता या नगरसेवकांमध्ये आहे.