बुलढाण्यात महायुतीमध्ये ज्या डिफेंडर कारवरुन वाद होतोय, त्याच डिफेंडर कारचे मालक अखेर माध्यमांसमोर आले आहेत.. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर या कारप्रकरणी कमिशनचे आरोप केले होते.. संजय गायकवाड यांनी कोणत्या कामाच्या कमिशन मधून कोट्यवधी रूपयांची डिफेंडर कार आणली असा सवालही विचारला होता. त्याचवेळी कोट्यवधींची ही कार ठेकेदार निलेश ढवळेंची असल्याचं स्पष्टीकरण संजय गायकवाडांनी दिलं होतं. अखेर या डिफेंडर कारचे मालके निलेश ढवळेच माध्यमांसमोर आले आहे. मात्र गाडीवर आमदाराचे स्टिकर इम्प्रेशन मारण्यासाठी लावल्याचं सांगत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय..