देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस जारी करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्ते राकेश कुमार सिंह आणि वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. यामुळे देशातील प्रत्येक नागरिक चिंतेत असल्याचा दावा करत, सध्याच्या व्यवस्थेमुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि निष्पक्षता धोक्यात आल्याचं विकास सिंह यांनी नमूद केलं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.... पुढील आठवड्यात याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे.