जळगाव शहरालगतच्या पाळधी ते जळगाव दरम्यान अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था समोर आली आहे. अवघ्या चार महिन्यापूर्वी झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे तडे गेले असून मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात नवविवाहितेचा मृत्यू झाला असून, या अपघातामागे रस्त्याची दुरवस्था कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच अपघात स्थळावरून नव्याने झालेल्या कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्याची नेमकी परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.