नागपूर शहरात कित्येक भागात गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी लोकं एजन्सीचं शटर उघडण्याआधीच रांगेत तिष्ठत उभे राहिल्याचं दृश्य दिसतंय. नागपूर जिल्ह्यातल्या चिचभवन इथल्या संजना गॅस एजन्सीबाहेरही मोठी रांग लागलीय.