रुग्णाला आजारातून बरं करणारे डॉक्टर.रुग्णांना दुसरं जीवन देणारे डॉक्टर.आपण खरंतर डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो.पण नॉर्वेतील डॉक्टरने किळसवाणं आणि तितकंच संतापजनक कृत्य केलंय.55 वर्षीय डॉक्टर आर्न बी याने 2004 ते 2022 या काळात अनेक महिला रुग्णांवर बलात्कार केला.70 महिलांनी त्याच्याविरोधात जबाब दिलाय. या कृष्णकृत्यांसाठी डॉक्टर आर्न बी याला 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.