Dadar Metro Station Name |दादर रेल्वे नाही तर दादर मेट्रो स्थानकाचं नाव बदलणार, पेडणेकरांचा विरोध

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चैत्यभूमी नामकरणासंदर्भातील प्रस्ताव हा दादर रेल्वे स्थानकासाठी नसून दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याचं समजत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असून दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्याबाबत प्रक्रिया सुरू होणार आहे. दादर मेट्रो स्थानकाच्या नामांतराच्या चर्चेवरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भूमिका स्पष्ट केलीय... दादर हे नाव हटवलेलं आम्हाला मान्य नाही.. मात्र स्थानकाला 'दादर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असे नाव दिल्यास त्याचं स्वागत करू, असे पेडणेकर म्हणाल्या.

संबंधित व्हिडीओ