दत्ता भरणेंनी कृषिमंत्रीपद स्वीकारताच त्यांना पहिलाच पेपर आला तो अतिवृष्टीचा कृषिमंत्री जालन्यात अतिवृष्टीची पाहणी करायला पोहोचले.त्यावेळी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना अक्षरशः घेरलं आणि त्यांच्यावर प्रश्नांचा आणि तक्रारींचा भडीमार केला. भरणेंनी कसंबसं शेतकऱ्यांना समजावलं.पण त्याचवेळी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही झापण्याची वेळ भरणेंवर आली.