नवी दिल्लीत आज राजकीय वातावरण तापलं आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत ‘इंडिया' आघाडीकडून भव्य ‘चलो दिल्ली’ मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत.