बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि मुंबईतून दोन संशयितांना अटक केली आहे. ठाण्यातून दीपक सिंह उर्फ दीप आणि दिल्लीतून विकास ठाकूर उर्फ विक्की यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.