दीपावली सणाची सुरुवात झाली असून, बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गडचिरोलीत मातीपासून बनवलेल्या दिव्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. ग्राहकांचा ओढा पारंपरिक मातीच्या दिव्यांच्या खरेदीकडे असल्याने कुंभारांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे.