अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं मात्र अजूनही मदत मिळालेली नाही. यावर चर्चा करुन मदत देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. तर पंचनामे तात्काळ सुरु करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली.. त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिले जातील अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.