धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. परळीच्या फौजदारी न्यायालयाकडनं मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केला होता. एक ऑनलाईन तक्रार दाखल केलेली होती आणि याबाबत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत.