अंजली दमानिया, सुरेश धस, बजरंग सोनावणे आणि मनोज जांगेच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाले. गुन्हा नोंद करण्यासाठी वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांचं सात तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे. दमानिया आणि मनोज जांगे धनंजय मुंडे बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं.