पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर धाराशिव पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच कला केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. नियमानुसार कलाकारांसाठी स्टेजची व्यवस्था करणे बंधनकारक असताना, बंद खोलीत नृत्य सादर केल्यामुळे आळणी येथील दोन आणि चोराखळी येथील तीन केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.