धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मुला राबवण्याचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिलाय.भाजपचा अध्यक्ष असताना अडीच वर्ष शिवसेनेचा उपाध्यक्ष, तर शिवसेनेचा अध्यक्ष असताना भाजपचा उपाध्यक्ष.मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सभापती पद देऊन सत्तेत सामावून घेतलं जाणार. अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर शिवसेनेकडून भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती.सत्ता स्थापनेच्या सूत्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेणार , दोघांची आज बैठक होण्याची शक्यता.राज्यातील बारा जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणावरून धाराशिव मधलेही सत्ता समीकरण ठरणार