Dharashiv| पावसाचा पत्ता नाही पण जळकोटमध्ये छत्रीसाठी तुफान गर्दी, नागरिकांच्या लांबच लांब रांगा

मराठवाड्यात पाऊसानं जरा सुट्टीच घेतल्यासारखं चित्र आहे... ढग दिसतात, पण पाऊस काही पडत नाही. मात्र धाराशिवच्या जळकोटमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. छत्री मिळवण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः लांबच लांब रांगा लावल्या, इतकंच काय तर कार्यक्रमासाठी खाजगी सुरक्षारक्षकही तैनात करावे लागले. पाऊस नसला तरी उन्हापासून बचाव आणि गरज पडली तर आधार देण्यासाठी छत्री उपयोगी पडेल, असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत. त्यामुळे पावसानं दडी मारलेली असताना छत्री वाटपाचा हा कार्यक्रम सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरलाय.

संबंधित व्हिडीओ