अहिल्यानगर महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचे पार्थिव आज अहिल्यानगर शहरात दाखल झाले. पार्थिव शहरात पोहोचताच अमर रहे आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुकुंदनगर भागात काम करत असताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. धीरज परदेशी यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असून शोकसभेलाही विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.