Dhule Drought| पाण्याअभावी शेतकऱ्यावर 300 फळझाडं तोडण्याची वेळ;60 फूट विहीर, 500 फूट बोअरवेलही कोरडी

दुष्काळाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, हंगामी पिकांसोबत आता वर्षानुवर्षे जपलेल्या फळबागाही उद्ध्वस्त होऊ लागल्यात...धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पाण्याअभावी शेतकऱ्याला स्वतःच्या हाताने तब्बल 300 फळझाडं तोडण्याची वेळ आलीय...शेतकरी निंबाजीराव झिपरू देवरे यांनी पाण्याअभावी आपल्या फळबागेतील आंबा, नारळ, चिकू, चिंच आणि फणसाची जवळपास 300 झाडं तोडलीत...तब्बल 2.14 हेक्टर क्षेत्रात उभी असलेली ही बाग अनेक वर्षांच्या मेहनतीतून फुलवण्यात आली होती...मात्र यंदाच्या भीषण दुष्काळामुळे 60 फूट खोल विहीर कोरडी पडली, तर 500 फूट खोल बोअरवेलमध्येही पाणी शिल्लक राहिलं नाही...पाण्याअभावी झाडं वाळू लागल्याने अखेर बाग तोडण्याचा कठोर निर्णय शेतकऱ्याला घ्यावा लागला, आणि फळबाग उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या उत्पन्नाचा मोठा आधारही हिरावला गेलाय.

संबंधित व्हिडीओ