धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल 80 हजार 208 पेट बॉटल्सचा साठा जप्त केला आहे. नरडाणा एमआयडीसीतील एका आस्थापनेवर ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या पाण्याच्या बाटल्यांची किंमत तब्बल 8 लाख 1 हजार 632 रुपये आहे. कमी दर्जाचे आणि मिथ्या छाप असल्याच्या संशयावरून हा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.