बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून डिझेलचा तुटवडा जाणवतोय.. अनेक ठिकाणी डिझेल मिळत नसल्याने मालवाहतूक करणारे वाहन चालक तसेच प्रवासी वाहनांचे वाहन चालक अडचणीत आलेयत... याबरोबरच बीड जिल्ह्यातून इतर ठिकाणी शेतीमाल घेऊन जाताना शेतकऱ्यांना देखील अडचणी येतायत.अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही तर ज्या ठिकाणी डिझेल मिळते त्या ठिकाणी ठराविक रकमेचं डिझेल दिलं जातंय... अशा स्थितीत लांब पल्ल्याच्या ठिकाणी जायचे कसे असा प्रश्न निर्माण झालाय.यावर आता प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी.