मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अखेर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपात आठवलेंना कुठेही स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे नाराज आठवलेंनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. काही जागांवर उमेदवारही दिले. अखेर महायुतीत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून फडणवीसांनी पुढाकार घेतला आणि आठवलेंची समजूत काढली. आठवलेंना नेमक्या किती जागा दिल्यात? त्यात भाजप आणि शिंदे किती जागा सोडणार आहेत? पाहूया