Jalgaon मध्ये महायुतीच्या मेळाव्यात वाद, BJP MLA मंगेश चव्हाण आणि सुमित पाटलांमध्ये वाद

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या महामेळाव्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष उघड झाला. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक वाद रंगला. सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यापासून तो वैध करण्यापर्यंत आपणच प्रयत्न केल्याचा दावा मंगेश चव्हाण यांनी केला. या वक्तव्यामुळे संतप्त झालेले सुमित पाटील व्यासपीठावरून उठून मेळाव्यातून बाहेर पडले. त्यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करत आपला अर्ज अवैध ठरवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा गंभीर आरोप केला. तसेच मंगेश चव्हाण यांचे काळे धंदे उघड करण्याचा इशाराही दिला.

संबंधित व्हिडीओ