दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन विभागाची (FDA) मोठी कारवाई सुरू आहे. विभागाने भेसळयुक्त मालाचा तब्बल 2 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेसळ करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. झिरवाळ आपल्या दिंडोरी तालुक्यातील वनारे गावी दिवाळी साजरी करत आहेत, त्यानिमित्ताने त्यांनी ही माहिती दिली.