बीडच्या इमापूर येथील पूरग्रस्त, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांशी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. युवासेनेच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. यात कपडे, फटाक्यांसह साहित्य होते. मराठवाड्यात आतापर्यंत ८० हजार किट वाटप झाले.