उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाची गरज का पडली? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं एक कार्यकर्ता शिबीर पार पडलं. या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली अगदी उद्धव ठाकरेंचंही भाषण झालं. मात्र या सगळ्या शिबिरातली एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही होती. बाळासाहेब ठाकरेंचं भाषण.