डोंबिवलीतील खंबाळपाडा येथे सर्पदंशामुळे एका चार वर्षीय बालिकेचा आणि तिच्या मावशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शास्त्री नगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. संतप्त नातेवाईकांनी केडीएमसी आरोग्य अधिकाऱ्याला धारेवर धरून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे