Strait of Hormuz च्या सुरक्षेसाठी इतर देशांनी पुढाकार घ्या, Donald Trump यांचं इतर देशांना आवाहन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे... होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायल एकत्र काम करत आहेत. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून लक्ष्य केल्या जात असलेल्या या महत्त्वाच्या जलमार्गाच्या संरक्षणासाठी इतर देशांनीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या या मार्गाच्या सुरक्षेसाठी सुमारे सात देशांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. चीनला या सामुद्रधुनीतून सुमारे 90 टक्के तेल मिळते, तर अमेरिकेचे अवलंबित्व कमी असल्याचा दावाही त्यांनी केला.

संबंधित व्हिडीओ