अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वावर जोरदार आगपाखड केलीय.संयुक्त राष्ट्रांकडे फार मोठी क्षमता आहे, ताकद आहे. मात्र जगातील समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरलेत.त्यांनी केवळ पोकळ शब्दांची मोठी पत्रं लिहीली आणि पोकळ शब्दांनी युद्ध थांबवता येत नाहीत असा घणाघात ट्रम्प यांनी केला. ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलत होते.. त्याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तानसारखी सात युद्ध थांबवल्याचा दावाही केला..