फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे सध्या आसियान शिखर परिषदेसह ईस्ट एशिया समिट आणि क्वाड देशांची बैठक पार पडतेय.
या बैठकीसाठी अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी हे पुन्हा भेटले
यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना टफ अर्थात खंबीर म्हणत त्यांचं कौतुक केलं.
क्वाड या संघटनेचे सदस्य देश जपान, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांचे प्रमुख एकत्र आलेत.
अरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही त्यांची क्वाड नेत्यांसोबत पहिलीच मोठी भेट मानली जात आहे...
यावेळी क्वाड नेत्यांबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना टफ मॅन म्हटलंय.
अलिकडेच भारत-अमेरिकेतील संबंध ताणले गेल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांचं कौतुक करत हे संबंध
सामान्य करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.