डबल केसरी हर्षवर्धन सदगीर सरकारी नोकरीपासून वंचित,DCM शिंदेंविरोधात नाराजी व्यक्त; हर्षवर्धनशी संवाद

गेल्याच महिन्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच चर्चेत ठरली होती.अंतिम रोमांचक सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडचा 4 - 2 असा पराभव करून 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 जिंकली होती... हर्षवर्धनने दुसऱ्यांदा गदा जिंकून सातवा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता... मात्र याचवेळी त्याने आपल्याला शासकीय नोकरी मिळत नसल्याची खंत जाहिरपणे व्यक्त केली होती... विशेष म्हणजे आज 38 दिवस उलटून देखिल हर्षवर्धन नोकरीपासून वंचित आहे...अद्याप नोकरी का मिळत नाहीये ? याचे उत्तर हर्षवर्धनला मिळत नसून नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हर्षवर्धनने नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून देखील मला अशी वागणूक मिळत असेल तर इतर खेळाडूंनी नक्की काय आदर्श घ्यावा ? असा प्रश्न हर्षवर्धनने NDTV मराठीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.दरम्यान हर्षवर्धनशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..

संबंधित व्हिडीओ