दीनानाथ रुग्णालय प्रकरणी डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी आता भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी महिला आघाडी विरोधात पक्षाला पत्र लिहत नाराजी व्यक्त केलीय.या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.गर्भवतीचा मृत्यू दुर्दैवी असला तरी घटनांची शहानिशा न करता केलेली तोडफोड अयोग्य आहे. असं त्यांनी पत्रात नमूद केलंय.तसेच नुकसानभरपाई व दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची प्रतिमा उंचावेल, असा सल्ला देत त्यांनी पक्षाला विचारपूर्वक कृती करण्याचे आवाहन केले आहे.