Drought | दुष्काळात सरकारची खर्चकपात कागदावरच ? Nagpur हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात 42 कोटींची वाढ

राज्यात दुष्काळाचे गंभीर संकट असताना, सरकारने खर्चकपातीचे धोरण जाहीर केले आहे. सरकारी खर्चात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी होणाऱ्या खर्चात तब्बल ४२ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आलंय.सुरुवातीला अधिवेशनाच्या तयारीसाठी ६८ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ४२ कोटी ९९ लाख रुपयांच्या अतिरिक्त कामांना मंजुरी दिल्याने हा खर्च ११० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चात काटकसरीचे निर्देश दिले जात असताना, हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे खर्चकपातीच्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित व्हिडीओ