Dharashiv Drought| तेरखेड्यातील फटाका उद्योगावर दुष्काळाचं सावट; फटाका उत्पादकांशी बातचीत NDTV मराठी

धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा परिसरात फटाके बनवणारे १५० हून अधिक कारखाने आहेत. सुतळी बॉम्ब, रॉकेट आणि स्काय शॉट्स हे इथल्या फटाक्यांचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांतही इथल्या फटाक्यांना मोठी मागणी असते.मात्र, यंदा दुष्काळाचं सावट दिवाळीवरही दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्याचा परिणाम फटाक्यांच्या मागणीवरही झाला आहे. तेरखेड्यातील फटाका उत्पादकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी

संबंधित व्हिडीओ