भिसे खिंडीत दरड कोसळली वाहतूक बंद.रोहा नागोठणे मार्गवरील भिसे खिंडीतील घाट भागात दरडी सोबत टेकडी वरील झाडे ही कोसळून रस्ता बंद झाला आहे.तसेच टेकडी वरुन वाहनऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी.रोहा नागोठणे मार्गांवर अनेक ठिकाणी पाणी साचले. पाण्याची लेवल वाढत असून गोड्या नदीला पाणी वाढलं आहे. भिसे खिंडीतील वरील बाजूकडून सतत माती अजून घसरत आहे. कदाचित मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता आहे.महादेव खार येथे सुद्धा रस्त्यावरती दरड आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. कोलाड शाळेकडून रोड बंद करण्याची मागणी होत आहे.