एकीकडे मराठी भाषा वाचविण्यासाठी ठाकरे बंधू आक्रमक झालेले असतांनाच दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये मराठी शाळेच्या ईमारतीतच शालेय शिक्षणमंत्री कार्यालय थाटणार असल्याची चर्चा आहे. शहराच्या मध्यवर्ती परिसरात पोलीस मुख्यालयाच्या जागेवर नाशिक महापालिकेची शाळा आहे. ही शाळा क्रमांक 16 ही 2018 सालापर्यंत दोन सत्रात शाळा भरत होती. मात्र आज या शाळेला घरघर लागली असून सध्या इथे तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीचे वर्ग भरत आहेत.दरम्यान या इमारतीत वरच्या मजल्यावरच आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कार्यालय थाटायची तयारी सुरू केली. याबाबतचा प्रस्तावही नाशिकच्या शिक्षण मंडळाकडून नाशिक महापालिकडे पाठवण्यात आलाय. मात्र अद्याप त्याला परवानगी देण्यात आलेली नाही. ऐकावं ते नवलच...नाशिक पालिकेच्या शाळेच्या इमारतीतच शालेय शिक्षण मंत्र्यांकडून स्वतःचं कार्यालय थाटण्याचा घाट