Eknath Shinde यांचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार?; गुप्त बैठकीला कोण कोण खासदार होते?

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे सेनेच्या 8 खासदारांची गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर शिंदे हे दरे या आपल्या मूळ गावी मुक्कामी पोहोचले आहेत. ठाण्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत शिंदेंनी सहा खासदारांची प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई मिररच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आलीय. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

संबंधित व्हिडीओ