करणाऱ्यांना कोर्टाने चपराक दिली असं वक्तव्य केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये काहीतरी भयंकर घडवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं वक्तव्यही मुख्यमंत्र्यांनी केलंय. कोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर ठरवलाय. राज्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा डाव विरोधकांचा आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी आज केला. कोर्टाने बंद बेकायदेशीर ठरवल्याची बातमी आम्हाला आता माहित पडली आहे. खरं म्हणजे यापूर्वी देखील, न्यायालयाने अशा प्रकारच्या बंद बाबत, निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते. त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो.