NDTV मराठीच्या बातमीची एकनाथ शिंदेंकडून दखल, ठाण्यातले अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवण्याचे आदेश

NDTV मराठीच्या बातमीची दखल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना थेट फोन करून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत.याशिवाय पावसाळ्यात वारा आणि पावसामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचेही कडक निर्देश देण्यात आले आहेत.धोकादायक होर्डिंग्स आणि बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.या निर्देशांनंतर पालिका प्रशासनाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. आज रात्रीपासूनच अनधिकृत होर्डिंग्सविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ