राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे.. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट 'ब' ची संयुक्त पूर्व परीक्षा देखील नियोजित आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..