अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याला छोटया व्यावसायिकांकडून अवाजवी वसुली
Exorbitant charges levied on small traders during Bail Pola in Ahilyanagar.
बैलपोळा आणि गणेशोत्सवासाठी शहरात तात्पुरते स्टॉल लावणाऱ्या लहान व्यावसायिकांकडून मनपाने नेमलेल्या ठेकेदार एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून अवाजवी वसुली होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या १० रुपयांच्या रस्ता शुल्कासाठी टोळक्याने येऊन दमदाटी करणे, साहित्य जप्त करण्याची धमकी देणे आणि अधिकृत पावती दाखवल्यावर थेट ‘आयुक्तांच्या नावाने’ धाक दाखवण्याचे प्रकार व्हिडिओद्वारे व्हायरल झाले आहेत. तर १० रुपयाच्या शुल्काऐवजी थेट १०० रु तर मंडप असलेल्या व्यावसायिकांकडे १०० हून अधिक रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.