इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगान प्रांतात बांदर अब्बास शहराजवळील शाहीद राजाई बंदरावर एक भीषण स्फोट झाला आहे.त्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 800 जण जखमी झाल्याची माहिती आहे.या प्रचंड स्फोटानंतर इराणी प्रशासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला.हा स्फोट शनिवारी सकाळी झाला. हा स्फोट इतका मोठा होता की जवळपासच्या कार्यालयांच्या खिडक्या फुटल्या तर एका इमारतीचं छतही कोसळलं.बंदरातील एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं बोललं जातंय. या कंटेनरमध्ये क्षेपणास्त्र इंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकांच्या एका शिपमेंटमुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.