धाराशिवमध्ये बोगस खताचा साठा शेतकऱ्यांनी केला जप्त.बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांकडून भांडाफोड.तीन टेम्पो खत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणून टाकलं.गोण्यांमध्ये रासायनिक खत नसून केवळ माती असल्याचे वास्तव जिल्हा कृषी अधीक्षकांसमोर उघड झाले आहे.या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि न्यायाची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला असून कृषी विभागाने खताचे सॅम्पल घेऊन चौकशी सुरू केली आहे.