मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा भीषण अडचणीत सापडला आहे. पेरण्या उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे.हातातून हंगाम जातो की काय, या चिंतेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून काढले आहे. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांची नाडी मानले जाणारे आठवडी बाजार आता पूर्णपणे कोलमडले आहेत.ज्या बाजारात दर आठवड्याला कोट्यवधींची उलाढाल व्हायची, तिथे आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच नसल्याने बाजारातही शुकशुकाट आहे.. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी