नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर ११ जणांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. FDA ची टीम नालासोपाऱ्यातील चामुंडा केक शॉपमध्ये दाखल झाली असून गेल्या दोन तासांपासून तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश चव्हाण स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचा आढावा घेत आहेत. दरम्यान, केक खाल्ल्यानंतर सात मुलं आणि चार महिलांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केकमध्ये मृत पाल आढळल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे.