मालाडमधील ब्लिंकइटच्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन झाल्याचं आढळल्यानंतर गोदामाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तपासादरम्यान गोदामात अस्वच्छता, तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचं समोर आलं.